हे पोर्टल महाराष्ट्र राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या महत्त्वाच्या क्षेत्रांबाबत सविस्तर माहिती प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. या पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी, परीक्षा, निकाल, विद्यापीठ संलग्नता, शिष्यवृत्ती, सार्वजनिक ग्रंथालये, आणि प्रकाशित संशोधन पत्रिका यांचा समावेश आहे. सध्या डॅशबोर्डवर २६ सार्वजनिक विद्यापीठे आणि ९ खाजगी विद्यापीठांचा नोंदणीकृत तपशील उपलब्ध आहे. संलग्नता, परीक्षा आणि निकाल या बाबींसंदर्भातील माहिती स्वयंचलित पद्धतीने पोर्टलवर पाठविण्याची प्रक्रिया सुरु आहे. डॅशबोर्डच्या पुढील टप्प्यात, उर्वरित सर्व अकृषी विद्यापीठांच्या माहितीचा तपशील देखील स्वयंचलित पद्धतीने उपलब्ध करून दिला जाणार आहे. हा डॅशबोर्ड सरकारला समानता आणि समतेची हमी देणारी प्रभावी धोरणे तयार करण्यात मदत करेल.